पाचोऱ्यात लसीकरण : ८ हजार नागरिकांनी घेतला लाभ

पाचोरा प्रतिनिधी । आज पाचोरा शिवसेनेच्या वतीने शहरातील विविध सहा भागात कोरोना प्रतिबंधात्मक महालसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या महालसीकरणात आज तब्बल ७ हजार ८५३ नागरिकांना लसींचा पहिल्या व दुसऱ्या डोसचा लाभ घेत शहरात लसीकरणाचा एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. यातून शिवसेनेने आपल्या – आपल्या समाजाभिमुख कार्याचा पुन्हा एकदा प्रत्यय शहरवासीयांपुढे ठेवल्याने सर्वसामान्य जनतेच्या मनात समाधानाचा भाव उमटतांना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती. त्यातच शहरातील विविध टोकाला राहणाऱ्या वयस्क व्यक्तींना लस घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत होते व तासंतास थांबावे लागत होते. याची दखल घेत आमदार किशोर पाटील यांनी प्रशासनाला सूचना करत शहरातील विविध भागात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज शहरातील चिंतामणी कॉलनी परिसरातील शिवतीर्थ पटांगणात, ड्रीम सिटी भागातील पालिकेने विकसित केलेल्या ओपन स्पेस मध्ये तसेच एम. आय. डी. सी. कॉलनी परिसरात, राजीव गांधी कॉलनी परिसरात, गणपती मंदिर ओपन स्पेस, संघवी कॉलनी परिसरातील सुनील झोपे यांचे घराशेजारील ओपन स्पेस मध्ये तसेच सिंधी कॉलनी भागातील झुलेलाल मंदिर परिसर अशा सहा ठिकाणी महालसीकारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

याठिकाणी शिस्तबद्धरित्या नागरिकांना कोविड – १९ लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला. त्यामुळे नागरिकांच्या चेहर्‍यावर समाधान पाहावयास  मिळत होते. दरम्यान शहरातील या विविध लसीकरण केंद्रांवर जाऊन युवानेते सुमीत किशोर पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, आदित्य बिल्दीकर, पी.बी.सी. मातृभूमीचे संचालक प्रवीण ब्राह्मणे यांनी पाहणी करत नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहीत केले. शिवसेनेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होतांना दिसत असून आमदार किशोर पाटील यांच्या प्रती आभाराचे भाव उमटतांना दिसत आहेत. महालसीकरण शिबिराच्या यशस्वीतेसाठी माजी उपजिल्हा प्रमुख गणेश पाटील, माजी उपजिल्हा प्रमुख अॅड. दिनकर देवरे, पप्पू राजपुत, बापू हटकर, नगरसेवक राम केसवानी, गजेंद्र पाटील, योगेश पाथरवट, सागर पाटील, अनिल राजपूत, नितीन चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

 

 

 

Protected Content