आमदारांनी विकास कामांची खोटी माहिती दिली : गटनेते जोशी (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी ।  आमदार राजूमामा भोळे यांनी एका वृत्तपत्रात त्यांनी केलेले विविध विकास कामे प्रसिद्ध केली आहेत. मात्र, यातील एकही काम त्यांनी केले नसून ते खोटी माहिती देवून शहरवासीयांची दिशाभूल करत असल्याचा आरोप शिवसेना गटनेते अनंत जोशी यांनी केला आहे.

 

जळगाव शहराचे आमादार राजूमामा भोळे यांनी त्यांच्या कामांच्या माहितीची पुरवणीवर आक्षेपाबाबत आज पत्रकार परिषद गटनेते अनंत जोशींनी घेतली. यावेळी त्यांनी आमदार भोळेंवर आरोपाच्या फायरी झाडत त्यांनी शहरात त्यांनी सात वर्षात कोणते महत्वाचे विकास कामे केले हे त्यांनी दाखवून द्यावे असे आव्हान दिले. अमृत योजना केंद्राची असून देशात जेथे भाजपाचे आमदार, खासदार  नाहीत अशा शहरामध्ये देखील ती सुरू झाले आहे. त्याकामाचे श्रेय देखील आमदार घेत आहे असा आरोप केला. आमदार भोळे हे हुडको कर्ज मुक्त केल्याचे सांगत असले तरी अद्याप महापलिका कर्जातून मुक्त झालेली नसून राज्यशासनाला तीन कोटीचा हप्ता आजही मनपा दर महिन्याला द्यावा लागत आहे. शिवाजीनगर पुलाचे काम मार्गी लावले असे ते म्हणत असून अजून या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. विद्यूत पोल स्थलांतर कामामुळे हे काम रखडलेले असून ते दोन वर्ष सत्तेत असतांना ते सोडू शकले नाही. असे महापालिकेतील घंटा गाडी, अग्निशमन गाड्यां त्यांच्यामुळे आल्या असे सांगत असले तरी शिवसेनेच्या सदस्यांच्या पाठपुरावामुळे हे वाहने आली असल्याचे जोशी यांनी माहिती दिली.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/348691346946659

 

Protected Content