Home Cities अमळनेर बापरे : जिल्ह्यात आणखी पाच नवीन कोरोना बाधीत: एकूण ३७ रूग्ण पॉझिटीव्ह

बापरे : जिल्ह्यात आणखी पाच नवीन कोरोना बाधीत: एकूण ३७ रूग्ण पॉझिटीव्ह

0
82


जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आणखी पाच कोरोना बाधीत रूग्ण आढळले असून यात भुसावळ, अमळनेर,अडावद पाचोरा, जळगावच्या प्रत्येकी एक समावेश असून यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ३७ झाली आहे.

सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा.

कोरोनाचा प्रकोप सुरूच असून यात आज पुन्हा एका रूग्णाची भर पडली आहे. नुकत्याच प्राप्त झालेल्या कोरोना तपासणी अहवालानुसार
जिल्ह्यातील संशयित रुग्णांपैकी 56 व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 51 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

तर पाच व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या आहेत. कोरोना बाधित व्यक्तीमध्ये भुसावळ येथील 15 वर्षीय मुलगा, अमळनेर येथील 55 वर्षीय, पाचोरा येथील 56 वर्षीय, तर जळगाव येथील 57 वर्षीय पुरूषांचा समावेश आहे.तसेच अडावद (ता. चोपडा) येथील एका रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 37 झाली आहे. यापैकी दहा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एक रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे.

आता प्राप्त झालेल्या निगेटिव्ह अहवालातील 51 व्यक्तींपैकी 16 व्यक्ती या अमळनेरच्या, 6 व्यक्ती पाचोरा, 4 व्यक्ती भुसावळच्या तर उर्वरित जळगावच्या आहेत. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००


Protected Content

Play sound