गावठी पिस्तूल व काडतुस केले जप्त; खरजईच्या तरूणासह एकाला अटक

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील खरजई येथील २३ वर्षीय तरूणाकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जीवंत काडतूस चाळीसगाव शहर पोलीसांनी जप्त केले. याप्रकरणी तरूणासह विक्री करणाऱ्या एकाला अटक केली असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती अशी की, तालुक्यातील खरजई येथील तरुणांकडे पिस्तुल असल्याची गोपानीय माहिती चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक कांतीलाल पाटील यांना मिळाल्यावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दि 15 रोजी दुपारी 3-15 वाजेच्या सुमारास  सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी यांच्यासह   पोकॉ.अमोल पाटील, पोना. दिपक पाटील, अमोल भोसले, निलेश पाटील, अशोक मोरे, गणेश कुवर, शरद पाटील यांनी खरजई येथे मोरया कृषी केंद्राजवळ संशयित रित्या उभा असलेल्या दीपक गणेश एरंडे (वय 23) रा. खरजई ता. चाळीसगाव याची चौकशी करून झडती घेतली असता त्याच्या जवळ कमरेस पँटच्या आतील बाजुस एक गावठी बनावटीचे पिस्टल खोचलेले मिळुन आले. या पिस्तुलाची किंमत 20 हजार रूपये इतकी  पोलीसांनी पितळी आवरण व समोरील बाजूस तांब्याची पॉइंट असलेले जीवंत काडतूसही ताब्यात घेतले. त्यास पोलीसी खाक्या दाखवताच त्याने सदर पिस्तुल व राऊंड पवन उर्फ अविनाश रमेश चव्हाण रा. रामवाडी, चाळीसगाव व भुषण रतन नवगिरे रा. रिंगरोड, पाटीलवाडा, चाळीसगाव यांचेकडुन 30 हजार रूपयात विकत घेतल्याची कबुली दिली.

पोलिसांनी  भूषण रतन नवगिरे रा. रिंगरोड, पाटीलवाडा, चाळीसगाव यास पण अटक करून दीपक गणेश एरंडे रा. खरजई व ते पिस्तुल विक्री करणाऱ्या पवन उर्फ अविनाश रमेश चव्हाण रा.. रामवाडी, चाळीसगाव व भूषण रतन नवगिरे रा. रिंगरोड, पाटीलवाडा, चाळीसगाव या दोघांवर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी हे करीत आहेत.

Protected Content