पाचोऱ्यात “विजयादशमी” निमित्त योगासन व प्राणायाम महाशिबिराचे आयोजन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा मतदार संघाचे आमदार श्रद्धेय आर. ओ. (तात्या) यांच्या “विजया दशमी” निमित्त भव्य अशा योगासन व प्राणायम महाशिबिराचे आयोजन त्यांची सुकन्या वैशाली सुर्यवंशी यांच्या तर्फे पतंजली शयोग समिती, हरिद्वार येथील राष्ट्रीय किर्तीचे प्रसिद्ध योगशिक्षक स्वामी बिग्र देव महाराज व स्वामी यज्ञ देव महाराज यांचे मार्गदर्शनाखाली दि. १ ते ५ आॅक्टोबर या दरम्यान पहाटे ५:३० वाजे पासुन ते ७ वाजेपर्यंत शहरातील एम. एम. महाविद्यालयाच्या प्रांगणावर आयोजित करण्यात आले आहे.

विजया दशमी म्हणजे स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांचा जन्म दिवस अर्थातच प्रेरणा दिवस आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनाचा, कृतीचा व विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नागरिकांच्या आनंदी, सुखी व निरोगी आरोग्यासाठी नि:शुल्क भव्य अशा योगासन व प्राणायम महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. योगा व प्राणायामाचा विचार हा समाज मनाला राष्ट्रीय चारित्र्य देणारा आहे. प्रत्येकाच्या देहात चैतन्याचा पाझर फोडणे व लोकांना सन्मार्गाला लावुन त्यांचे आरोग्य निरोगी ठेवणे हाच उद्देश या शिबिरा मागील आहे.

व्यायामाचा अभाव व आरोग्या विषयी अनास्था यामुळे आपले जीवन अल्पायुषी न ठरता दिर्घायुषी व्हावे म्हणूनच दि. १ आॅक्टोबर ते दि. ५ आॅक्टोबर पर्यंत पहाटे ५:३० वाजे पासुन ते सकाळीं ७ वाजेपर्यंत सुमारे दिड तास जास्तीत जास्त नागरिकांनी या महाशिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन निर्मल सीड्सच्या संचालिका तथा निर्मल इंटरनॅशनल स्कुलच्या अध्यक्षा वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी यांचेसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, लोक प्रतिनिधी, संभाजी ब्रिगेड पदाधिकारी यांनी केले आहे.

Protected Content