सुसाईड नोट लिहून प्रौढ व्यक्तीने स्वत:ला संपविले ! (व्हिडीओ)

सुसाईड नोट लिहून तिघांवर आरोप केला आहे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तिघांच्या दबावाला कंटाळून ट्रान्सपोर्ट व्यवसायाकाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता उघडकीला आले. आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून तिघांवर आरोप केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत शामराव जाधव (वय-४८) रा. गणपती मंदीराजवळ, अयोध्यानगर, जळगाव हे आपल्या पत्नी व दोन मुलासंह वास्तव्याला होते. त्यांचे अजिंठा चौक येथे भागवत ट्रान्सपोर्ट नावाने ट्रकच्या माध्यमातून सामानांची ने-आण करत होते. शुक्रवारी ३० सप्टेंबर रोजी दुपारी दुपारी १२ वाजता पत्नी सुनिता बाहेर गेल्या होत्या तर दोन्ही मुले कॉलेजला गेले होते. त्यामुळे भागवत जाधव हे एकटेच होते. त्यांनी घरातच्या छताला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. दुपारी १२.३० पत्नी सुनिता ह्या घरी आल्यावर हा प्रकार उघडकीला आला. सुनिता जाधव यांनी आरडाओरड केल्यानंतर शेजारील नागरीकांनी धाव घेत खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले.

भागवत जाधव यांनी आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यात दिनेश माने, बापू पाटील आणि कंपनीचे मालक पाटील या तीन जणांची नावे लिहीली आहे. आठ दिवसांपुर्वी दिनेश माने, बापू पाटील व कंपनीचे मालक पाटील यांनी त्यांच्या ट्रकमध्ये सामान भरून कलकत्ता येथे पाठविण्यासाठी सांगितले. परंतू भागवत जाधव यांनी ट्रकमध्ये माल लोड करू नका असे सांगितले. परंतू जबरदस्तीने सामान ट्रकमध्ये भरला. याच्या मोबदल्यात ४५ हजार रूपये ॲडव्हान्स देणार होते. परंतू अद्यापपर्यंत कोणतेही पैसे दिले नाही. त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.

दरम्यान, दिनेश माने, बापू पाटील आणि कंपनीचे मालक पाटील हे गुरूवार २९ सप्टेंबर रोजी रात्री यांनी वडील भागवत जाधव यांना बोलावून धक्काबुक्की केली होती. तिघांच्या दबावातून वडीलांनी आत्महत्या केली आहे असा आरोप मयत भागवत जाधव यांचा मुले योगेश, तेजस यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना केला आहे. तिघांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content