जामनेर नगरपालिकेतर्फे मॅरेथॉन स्पर्धा

 

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छ संरक्षण 2023 माजी वसुंधरा व राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा समर्पण पंधरवाडा अंतर्गत शुक्रवार रोजी सकाळी 6 वाजता महाराणा प्रताप चौक ते सोनबर्डी पर्यंत मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन नगराध्यक्ष साधना महाजन व मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.

या स्पर्धेला उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांनी झेंडी दाखवून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.

नगरपालिकेतर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पहिल्या पाच खिलोना नगराध्यक्ष साधना महाजन व उपनगर अध्यक्ष महेंद्र बाविस्कर जितेंद्र पाटील यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.

या स्पर्धेत पहिले बक्षीस नितीन यमनेते (मलकापूर), द्वितीय बक्षीस सुनील बारेला (मनुदेवी यावल), देवलसिंग राठोड (मोंढाळा भुसावल), तृतीय बक्षीस जयेश पाटील, (ममुराबाद जळगाव ), चौथ्या क्रमांकाचे बक्षीस कृष्णा थाटे (केकट निंभोरा जामनेर) अशाप्रकारे विजेते स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले.

सदर मॅरेथॉन स्पर्धेतील खेळाडूंनी सुमारे पाच किलोमीटर अंतर 13 मिनिटांमध्ये पार केल्यामुळे त्यांचे अभिनंदन यावेळी करण्यात आले.

नगरपालिका गट नेते डॉक्टर प्रशांत भोंडे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक भगवान सोनवणे रवींद्र शिवदे, फारुख मण्यार, उल्हास पाटील, सुधाकर माळी, अनिस शेख यांच्यासह उपमुख्य अधिकारी दुर्गेश सोनवणे नगरपालिका कर्मचारी सागर पाटील आत्माराम शिंदे समाधान वाघ आधी यावेळी उपस्थित होते.

Protected Content