नेरी येथील व्यक्तीचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू; लोहारी येथील घटना

पाचोरा प्रतिनिधी । ट्रक्टरवर बसलेल्या तालुक्यातील नेरी येथील ५० वर्षीय व्यक्तीचा ट्रक्टरखाली दबून मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना तालुक्यातील लोहारी बुद्रुक गावाजवळ घडली. याप्रकरणी पिंपळगाव पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लुकमान उस्मान पठाण (वय-५०) रा. नेरी ता. पाचोरा असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.  लुकमान पठाण हे आपल्या कुटुंबासोबत गेल्या ५ वर्षांपासून मध्यप्रदेशात ऊसतोडीसाठी जात असतात. त्यांचेकडे साखर कारखान्याचे दोन ट्रॅक्टर आहे.  काल रविवारी १७ ऑक्टोबर रोजी  सायंकाळी ५:३० वाजेच्या दरम्यान नेरी येथुन पहुरमार्गे मध्यप्रदेशात जाण्यासाठी निघाले होते. त्यांचा मोठा मुलगा बबलु लुकमान पठाण हा ट्रॅक्टर चालवित असतांना लोहारी गावाजवळ ट्रॅक्टरमधील साहित्यावर बसलेले असतांना लुकमान पठाण याचा तोल जावुन ट्रॅक्टरचे मोठे टायर त्यांचे डोक्यावरुन गेल्याने ते जागेवरच ठार झाले. मयताचे शवविच्छेदन डॉ. अमित साळुंखे यांनी केल्यानंतर सदरच्या गुन्ह्याची नोंद पाचोरा पोलिसात होवुन शुन्य क्रमांकाने पिंपळगाव हरे. पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे.

मयत इसमास वृद्ध आई, पत्नी, तीन मुले व दोन मुली असा परिवार असून त्यांचेवर नेरी येथे आज १८ रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा भोये यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार विजय माळी हे करत आहेत.

Protected Content