फैजपूर येथे २७ जानेवारीपासून विष्णुयाग नामसंकीर्तन महोत्सव

Vishnayag Namaskirtan Festival at Faizpur

 

फैजपूर प्रतिनिधी । येथील खंडोबा वाडी मंदिर आवारात येत्या दि.२७ जानेवारी ते ३ फेब्रूवारी २०२० दरम्यान २७ कुंडी विष्णुयाग व नामसंकीर्तन महोत्सवाचे आयोजित करण्यात आले आहे.

या महोत्सवाचे ध्वजारोहण प.पु. प्रसाद महाराज (अमळनेर) यांच्याहस्ते नुकतेच करण्यात आले. या महोत्सवात विष्णुयाग व गाथा पारायण व प.पु.चैतन्य महाराज देगलूरकर यांचे योगी पावन मनाचा ही प्रवचनमाला होईल, व प.पु.चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे काल्याचे किर्तनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. यावेळी कार्यक्रमाची रूपरेषा नरेंद्र नारखेडे यांनी दिली.

विश्व कल्याणाकरीता भगवान विष्णूची भक्ती व साधना घडावी, यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. असे प्रतिपादन प्रसाद महाराज यांनी केले आहे. महोत्सवात सर्वांनी सहभागी होऊन आनंद घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमास माजी आमदार अरुण पाटील, नगराध्यक्षा महानंदा होले, माजी नगराध्यक्ष भास्कर चौधरी, चोलदास पाटील, पांडुरंग सराफ, नगरसेवक हेमराज चौधरी, देवेंद्र बेंडाळे, देवेंद्र साळी, केतन किरंगे, चंद्रशेखर चौधरी, राम मनोहरदास, वेदभूषण हेमंत धर्माधिकारी, प्रवीण महाराज भावसार, योगेश भावसार, हरीश अत्तरदे, नीलकंठ सराफ, सी.के.चौधरी, रमेश महाजन, विजय महाजन, तेनु फेंगडे रोझोदा, भगवंत महाराज चौधरी खानापूर, राम पाचपांडे, पंडित कोल्हे, दुर्गादास महाराज नेहते, पराग महाराज चोपडे, भास्कर बोनडे, पांडुरंग पाटील, हिरामण भिरुड, प्रा. व.पु.होले, गणेश भारंबे, सुरेश परदेशी, अनिल नारखेडे, सुनील नारखेडे, प्रा.आर.पी.झोपे, मनोजकुमार पाटील, चंद्रशेखर चौधरी, काशिनाथ वारके, व महिला मंडळ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content