एकनाथ कोळी यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनधी | तालुक्यातील उचंदा येथील ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेले ग्रामसेवक एकनाथ चुडामन कोळी यांना  सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह घाटी औरंगाबादचा सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

 

 

एकनाथ कोळी यांनी गेल्या पाच वर्षापासून गावांमधील सर्वत्र शासकीय कामकाज असेल किंवा महामारी सारख्या कोरोना काळ त्यांनी तालुक्यामध्ये सर्वात उल्लेखनीय कार्य केले आहे. कोरोना काळात अहवाल गावामध्ये पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी योग्य त्या शासनाच्या ध्येय धोरणानुसार अंमलबजावणी करणे, गावातील लोकांना विनामास्क न फिरू देणे आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना केली होती. तसेच गावातील विकास कामे जशी स्मशानभूमीचे दुरुस्ती,   पथ दिवे लावणे. तसेच विविध शासकीय योजनेबाबत गावांमध्ये जनजागृती करणे. गटारी रस्त्यांची दुरुस्ती करणे. त्यांना महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. त्यांनी गरिबीच्या परिस्थितीतून शून्यातून विश्व निर्माण केले आहे. एकनाथ कोळी हे गेल्या अनेक दिवसापासून शासकीय सेवेमध्ये आहेत.  त्यांची गोरगरीब सर्वसामान्यांशी आपुलकीची नाळ जुळलेली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन.हा पुरस्कार सोहळा सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी रुग्णसेवा समूह घाटी औरंगाबाद मार्फत शुक्रवार दि. ३० डिसेंबर रोजी  प्रदान केला जाणार असल्याचे निवड समिती तर्फे पत्राद्वारे समाजसेवक सुमित पंडित यांनी कळविले आहे. ह्या पुरस्काराने एकनाथ चुडामन कोळी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

 

Protected Content