Home धर्म-समाज वरणगावात सर्वपक्षीय तिरंगा पदयात्रा

वरणगावात सर्वपक्षीय तिरंगा पदयात्रा

0
54

वरणगाव  – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरामध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय पदाधिकारी व नेतेमंडळींनी तिरंगा पदयात्रा काढली. या रॅलीमध्ये महिला पुरुषांसह विविध पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.

भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरामध्ये आज रविवार, दि. १४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बसस्टँड चौकामध्ये भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले. वरणगाव शहरातून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी तिरंगा पदयात्रा काढली. यावेळी ‘भारत माता की जय, वंदे मातरम’च्या घोषणांनी वरणगाव परिसर दुमदुमून निघाला होता.

याप्रसंगी माजी भाजपा नगराध्यक्ष सुनील काळे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, शहर प्रमुख शिवसेना संतोष माळी यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound