कोरोना महामारीचा नायनाट करण्यास प्रशासन सज्ज : डॉ. अजित थोरबोले

फैजपूर, प्रतिनिधी । कोरोना महामारीचा नायनाट करण्यास प्रशासन सज्ज असल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे स्वतंत्र दिनानिमित्ताने आयोजित कोरोना योद्धयांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून केले.

डॉ. अजित थोरबोले पुढे म्हणाले की, कोरोना रोगाचा संपुर्ण नायनाट करण्यासाठी प्रशासन सज्ज असून वैद्यकिय अधिकारी त्यांचे सर्व सहकारी तसेंच ऑक्सिजन यंत्रणा सह सुव्यवस्था रुग्णांना सेवा देत आहे. हे संकट अजूनही संपलेली नाही. जनतेने नियमाचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. नियमांची काळजी घेणारेच यांपासून बचवणार आहे.

याप्रसंगी प्रास्ताविकात चेअरमन नरेंद्र नारखेडे यांनी सांगितले की, परिसरातील सर्व सहकारी संस्था व लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते प्रशासन समवेत काम करून या कोरोनावर मात करू या यंत्रणेत काम करणारे सर्वांचे बळ वाढावे यासाठी आज कोरोना योद्धे यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. त्यांनी आपले प्राणाची पर्वा न करता आपली सेवा प्रमाणिकपणे देत आहे याबद्दल त्यांचा सन्मान चेअरमन नरेंद्र नारखेडे यांनी प्रांताधिकारी थोरबोले यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला.

यावेळी, तहसिलदार जितेंद्र कुवर, नगराध्यक्ष महानंदा होले, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला, डॉ. हेमंत बऱ्हाटे, डॉ. कौस्तुभ तळेले, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. रेखा पाटील, अनिल नारखेडे, निळकंठ सराफ, अप्पा भालचंद्र चौधरी, नायब तहसिलदार आर. के. पवार , आर. डी. पाटील, मंडळ अधिकारी जी. डी. बंगाळे, तलाठी जावळे, पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे, संचालक डॉ. गणेश चौधरी, विजयकुमार परदेशी, सुरेश परदेशी, रवींद्र चौधरी भास्कर बोन्डे, सुनील नारखेडे, चंद्रशेखर चौधरी, देवेंद्र साळी, यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन किरण चौधरी यांनी तर आभार डॉ. गणेश चौधरी यांनी मानले.

Protected Content