जळगाव, प्रतिनिधी । भारतीय संविधानचा अवमान केलेल्या प्रविण तरडे यांचेवर गुन्हे दाखल करावा अशी मागणी आज राष्ट्रीय दलित पँथर संघटनेने केली आहे
तरडे यांनी गणेश मुर्ती खाली संविधानाची पुस्तिका ठेवुन संविधानाचा अपमान केलेला आहे सध्या गणेशोत्सव सुरू असतांना प्रविण तरडे यांनी दलित आणि सवर्ण यांच्यामध्ये वाद निर्माण व्हावा म्हणून हे कृत्य केलेले आहे. असा आरोप या संघटनेने केला आहे

प्रवीण तरडे यांचा राष्ट्रीय दलित पँथरचे जिल्ह्ध्यक्ष राजुभाऊ महाले यांनी जाहीर निषेध केला आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तरडे यांचा फोटो असलेले पोस्टर जाळण्यात आले.
प्रविण तरडे यांना अटक करण्यात यावी, अन्यथा राष्ट्रीय दलित पँथर त्यांचे चित्रपट महाराष्ट्रामध्ये चालू देणार नाही, याची शासनाने दखल घ्यावी व यापुढच्या आंदोलनात काही घडल्यास त्यास शासन जबाबदार राहील., असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनावर शामभाऊ सोनवणे, शांताराम अहिरे आदींच्या सह्या आहेत .


