Home धर्म-समाज सावदा हायस्कूलमध्ये ३० बाय ३० फुटांची भव्य रांगोळी ; तिरंगा व राजमुद्रा...

सावदा हायस्कूलमध्ये ३० बाय ३० फुटांची भव्य रांगोळी ; तिरंगा व राजमुद्रा साकारून संकल्प दिन साजरा

0
12


सावदा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील श्री आनंदीबाई गंभीरराव हायस्कूल व श्री नामदेवराव गोमाजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींनी तब्बल ३० फूट बाय ३० फूट आकाराची भव्य रांगोळी रेखाटून ‘संकल्प दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या विशेष उपक्रमात विद्यार्थिनींनी राष्ट्रीय प्रतीक असलेला तिरंगा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा यांची अत्यंत देखणी व आकर्षक रांगोळी साकारली.

या भव्य रांगोळीच्या निर्मितीसाठी झेंडूची फुले, शेवंतीची फुले, कडुनिंबाची पाने, विविध रंगांची रांगोळी व गुलाल अशा नैसर्गिक आणि आकर्षक रंगसाहित्याचा वापर करण्यात आला. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सकाळी ११ ते दुपारी २ या अवघ्या तीन तासांच्या कालावधीत पूर्ण एकाग्रतेने व कलात्मकतेने ही अवाढव्य रांगोळी पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

विद्यार्थिनींच्या या सुंदर कलाकृतीचे कौतुक करण्यासाठी सावदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रेणुका राजेंद्र पाटील, शिक्षण सभापती सचिन चुडामण बऱ्हाटे, नगरसेविका सौ. प्रतीक्षा मनीष भंगाळे, सौ. सुनीता संजय तायडे यांच्यासह प्रमोद चौधरी, खक्के सागर चौधरी, मनीष भंगाळे, संजय तायडे व सावदा शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक विशेषत्वाने उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थिनींच्या अप्रतिम कलागुणांचे, मेहनतीचे व देशप्रेमाचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहनपर पेन भेट देऊन सन्मानित केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य संजय मोतीराम महाजन, कलाशिक्षक नंदकिशोर घनश्याम पाटील, अरुण छगन राठोड सर व श्रीमती भारती सतीश भंगाळे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी ही भव्य रांगोळी साकारली असून, या उपक्रमातून देशप्रेम, सर्जनशीलता आणि सामूहिक प्रयत्नांचे सुंदर दर्शन घडल्याने सर्वच स्तरातून या विद्यार्थिनींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.


Protected Content

Play sound