राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण ४०३५ प्रकरणे निकाली

जळगाव  – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हयातील न्यायालयात आज ‘राष्ट्रीय लोक अदालत’मध्ये न्यालयातील प्रलंबीत व वादपूर्व अशी एकूण ४०३५ प्रकरणे निकाली निघाली.

आज शनिवार, दि. १३ ऑगस्ट रोजी जळगांव जिल्हा न्यायालय, सर्व तालुका न्यायालय, कौटुंबिक न्यायालय, औद्योगिक न्यायालय, कामगार न्यायालय, जिल्हा ग्राहक तक्रार आयोग, सहकार न्यायालय येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशाप्रमाणे न्यायालयातील प्रलंबित व वादपूर्व अशी एकूण ११०६६७ तडजोड पात्र प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती.

जळगांव जिल्हयातील न्यायालयात आज दिनांक आज शनिवार, दि. १३ ऑगस्ट रोजी आयोजीत ‘राष्ट्रीय लोक अदालत’मध्ये एकुण ११ प्रकरणात बऱ्याच वर्षांपासून विभक्त असलेले पती व पत्नींमधील असलेले वाद संपुष्टात आले व त्यांनी पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात केली. तसेच बऱ्याच मोटार अपघातांच्या व दिवाणी स्वरुपांच्या प्रकरणांमध्ये व्हिडीओ कॉन्फरंन्सींगव्दारे तडजोड करुन सदर प्रकरणे निकाली काढण्यात आले. सन २०१४ पासून प्रलंबीत असलेले मोटार सायकल चोरीचे प्रकरण देखील आपसात तडजोड करुन निकाली काढण्यात आले.

सर्व न्यायाधीश वृंद, वकिल, न्यायालयीन कर्मचारी, दोन्ही बाजूचे पक्षकार यांचे मदतीने ३०१७ दाखलपूर्व व न्यायालयातील प्रलंबीत १०१८ प्रकरणे निकाली काढण्यात आली व त्या माध्यमातून एकूण रक्कम रुपये २५,०८,४१,३१९/- वसुल करण्यात आले. तसेच कौटुंबिक न्यायालयाचे १२ प्रकरणे व जिल्हयात स्पेशल ड्राईव्ह मार्फत १६६८ प्रकरणे तसेच जिल्हयातील प्रलंबित पोलीस चलानचे शेकडो प्रकरणे निकाली काढण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व जळगांव सत्र न्यायाधीश एम. आर. देशपांडे, जळगांव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव ए.ए.के.शेख, जिल्हा वकिल संघ अध्यक्ष केतन ढाके, व जळगाव जिल्हा सरकारी अभियोक्ता वैशाली महाजन, जळगांव जिल्हा वकिल संघ उपाध्यक्ष स्वप्नील पाटील, जिल्हा वकिल संघ सचिव व जिल्हा वकिल संघाचे सर्व सदस्य, तसेच पॅनल न्यायाधीश डी. वाय. काळे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश -१, जे. जे. मोहिते, तदर्थ जिल्हा न्यायाधीश ३, जे. जी. पवार, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश व स्तर जळगांव, श्रीमती व्ही. एस. देशमुख, मुख्य न्यायदंडाधिकारी, जळगांव, एस. पी. जसवंत, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर जळगांव, पी. आर. वागडोळे, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर जळगांव, तसेच अॅड प्रविण पांडे, अॅड. भारती खडसे, अॅड व्हि. एस. काबरा, अॅड. विरेंद्र पाटील, अॅड मंजुळा मुंदडा, अॅड संदिप पाटील, अॅड ज्योती भोळे, अॅड नेहा खैरनार, अॅड सिमा झाल्टे, अॅड अपूर्वा दलाल, अॅड दिपाली सोनवणे, अॅड शितल राठी, तसेच विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यालयीन कर्मचारी प्रकाश काजळे, भालचंद्र सैंदाणे अविनाश कुळकर्णी, प्रमोद पाटील, प्रमोद ठाकरे, चंद्रवदन भारंबे आदिंनी परिश्रम घेत लोक अदालत यशस्वी केली.

Protected Content