Home Cities जळगाव नशिराबादेत सप्ताह सोहळा उत्साहात साजरा

नशिराबादेत सप्ताह सोहळा उत्साहात साजरा

0
36


नशिराबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री हभप सुनिल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनातून सालाबाद प्रमाणे आयोजित अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

या सप्ताह सोहळ्याच्या प्रारंभ श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पोथीचे किरण शांताराम माळी यांनी सपत्नीक पूजन झाले. तदनंतर विष्णू सहस्त्रनाम व पारायण ला सुरुवात करण्यात आली. सप्ताह सोहळात काकडा, पारायण, हरिपाठ व किर्तन असे दैनादिन कार्यक्रम साजरा करण्यात आले.

तर आज सकाळी ठीक ८.०० वाजता दिंडी सोहळ्याला सुरुवात करण्यात करण्यात येऊन यात दिंडीचे प्रमख आकर्षण विठ्ठल वेशभूषेत असलेला रिद्देश अनिल माळी हा ठरला यात सर्व पुरुष व महिला भाविकांनी विठ्ठल नामाच्या गजरात पाऊली खेळत दिंडी सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच विकास पाटील, नशिराबाद शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष पिंटू शेठ, शिवसेना शहराध्यक्ष विकास धनगर, शिव सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चव्हाण, माजी सरपंच पंकज महाजन, डी.डी. माळी यांच्यासह राजेंद्र महाराज केकत निभोंरा यांनी काल्याचे किर्तन करून सर्व भाविकांची मोठी गर्दी होती.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संत सावता महाराज यांच्या मंडळ वरची आळी उपाध्यक्ष संदीप पाटील, सेक्रेटरी पंढरीनाथ पाटील, सचिव प्रवीण महाजन, सभासद अशोक माळी, जगन्नाथ पाटील, मधुकर माळी, सतोष पवार, सुनिल दगडु महाजन, गणेश पाटील, हेमराज महाजन, सदिप जगताप, संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळ तसेच गावातील सर्व भजनी मंडळ उपस्थिती  अनमोल परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound