घरातून ५४ हजारांचा ऐवज लांबविणाऱ्या केअरटेकरला पाठलाग करून अटक

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील कोथडी येथे  अपंग मुलाची देखभालीसाठी ठेवण्यात आलेल्या केअरटेकरने घरातील सदस्यांचा विश्वास संपादन करून मोबाईल, टॅबसह रोकड असा एकुण ५४ हजारांचा ऐवज लांबविणाऱ्या संशयिताला मुक्ताईनगर पोलीसांनी जामनेर मधून अटक केली आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत शिवाजीराव गरड रा. यशवंत नगर, लातूर असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे.

याबाबत अधिक असे की, मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथे मीना बरसु खडसे यांचा अपंग मुलगा श्रीकांत याच्या देखभालीसाठी छत्रपती संभाजी नगर येथील नवजीवन नर्सिंग ब्युरो मार्फत केअरटेकर म्हणून संशयित आरोपी प्रशांत शिवाजीराव गरड हा आलेला होता. त्याने घरच्या घरच्या लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडे असलेल्या मोबाईलमधील बँकिंग अॅप मधील पासवर्ड पाहिला होता. त्यानुसार त्याने १ नोव्हेंबर रोजी मीना खडसे व त्यांच्या घरच्या लोकांना हर्बलशेक मधून काहीतरी गुंगीकारक औषध देऊन बेशुद्ध केले व घरातील ५० हजार रुपये किमतीचा टॅब, तीन मोबाईल व ३ हजारांची रोकड आणि ३५ हजार रूपये किंमतीची स्कुटी चोरून नेली. शिवाय त्याने बँक अकाउंट मधून १९  हजार रुपये काढून घेतले. ही घटना घडल्यानंतर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  त्यानुसार मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे हे तपास करत होते.

दरम्यान संशयित आरोपीने ही चोरून नेलेली स्कुटी भुसावळ रेल्वे स्टेशनच्या बाहेर लावलेली असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलिसांनी ही दुचाकी जप्त केली. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी तांत्रिक मदतीच्या आधारे संशयित आरोपी प्रशांत गरड  हा लातूर येथे असल्याचे माहिती मिळाली. त्यानुसार पथकाला लातूर येथे रवाना केले. दरम्यान मुक्ताईनगर पोलिसांनी लातूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकारी यांची मदत घेऊन पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे व पोलीस अंमलदार माधव गोरेवार यांनी प्रशांत गरड याचा लातूर येथे शोध घेतला. परंतु तो छत्रपती नगर छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याचा पाठलाग केला असता  २६ नोव्हेंबर रोजी जामनेर शहरातील बस स्थानकातून अटक केली.

त्याच्यातून त्याच्याजवळून चोरून नेलेला सॅमसंग कंपनीचा टॅब, तीन मोबाईल, १ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम राजकुमार, पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे व मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे, पोलिस अंमलदार माधव गोरेवार आणि रवींद्र धनगर यांनी केली आहे

Protected Content