पैश्यांसाठी विवाहितेचा छळ; शनीपेठ पोलीसात पाच जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रिधुरवाडा येथील विवाहितेचा पैशांवरुन शारिरीक व मानसिक छळ करणार्‍या पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, रिधुरवाडा येथील शितल उमेश बाविस्कर यांचा उमेश बाविस्कर यांच्याशी विवाह झाला. विवाहनंतर काही दिवस चांगले गेल्यानंतर पती उमेश याच्यासह सासरच्या मंडळींनी शितल हिस माहेरुन पैसे आणण्याची मागणी केली. यावरुन पती उमेश याने शितल हिस मारहाण केली. तर इतरांनी वेळावेळी शिवीगाळ करत घरातून निघून जा, तसेच घटस्फोट देण्याची धमकी देत शारिरीक व मानसिक छळ केला. २५ एप्रिल २०२१ ते १७ नोव्हेंबर २०२१ दरम्यान होणारा छळ असह्य झाल्यानंतर शितल बाविस्कर या माहेरी निघून आल्या. व छळाबाबत शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन शिलतचे पती उमेश भागवत बाविस्कर , सासरे भागवत दामू बाविस्कर, नणंद रुपाली भागवत बाविस्कर, मावस नणंद वैशाली संजय कोळी, मोठी नणंद दिपाली विकास सोनवणे रा. रिधुरवाडा, जळगाव या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार मनोज इंद्रीकर हे करीत आहेत.

Protected Content