लॉटरी लागल्याचे सांगत महिलेला ३ लाखाचा ऑनलाईन गंडा

जळगाव प्रतिनिधी । कौन बनेगा करोडपतीची २५ लाखांची लॉटरी लागल्याचे भासवून चाळीसगाव तालुक्यातील एका महिलेची २ लाख ९२ हजार ७०९ रुपयांत ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

सविस्तर माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील महिलेस दि. ८ नोव्हेंबर रोजी अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. फोनवर बोलणार्‍या संबंधितांने त्यांना ‘तुम्हाला २५ लाख रुपयांची कौन बनेगा करोडपतीची लॉटरी लागली आहे,’ असे सांगितले. त्यानंतर वेगवेगळ्या नंबरवरुन वेगवेगळ्या नावांनी संबंधितांनी फोन करुन त्यांचा विश्‍वास संपादन केला. तसेच लॉटरी लागलेले २५ लाख रुपये मिळविण्यासाठी इन्कम टॅक्स व इतर चार्जेसच्या नावाखाली त्या महिलेस ऑनलाईन पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने संबंधितांना दहा दिवसात वेळावेळी २ लाख ९२ हजार ७०९ रुपये ऑनलाईन पाठविले. पैसे स्विकारल्यानंतर कुठल्याही प्रकारचे लॉटरी लागल्याचे पैसे मिळाले नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर सदर महिलेने यांनी बुधवार, १७ नोव्हेंबर रोजी जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या क्रमाकांवरुन फोन करणार्‍या अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.

Protected Content