निवृत्ती नगरातील कार्तिक स्वामींचे मंदीर दर्शनासाठी सलग तीन दिवस खुले(व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | निवृत्ती नगरात कार्तिक स्वामींच्या मंदिर गुरूवार १८ नोव्हेंबर रोजी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त दुपारी १२ वाजेपासून सलग तीन दिवस मंदिरे दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे, अशी माहिती जळगाव केरळी महिला ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्ष वासंती अय्यर यांनी दिली आहे. कार्तीक स्वामींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

 

संपूर्ण केरळी पध्दतीने बांधलेले हे मंदिर गेल्या २५ वर्षापासून कार्तिकी पोर्णिमेनिमित्त दर्शनासाठी खुले करण्यात येते. यंदाही कार्तिक स्वामींच्या मंदिरांमध्ये कार्तिकी पौर्णिमेनिमित्त उत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, भाविकांची गर्दी होणार नाही, यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून देखील नियोजन केले गेले आहे.

या मंदिरात कार्तिकस्वामी व्यतिरीक्त नवग्रह व इतर देवतांचीदेखील मंदिर असून, ते वर्षभर दर्शनासाठी खुले असते. कार्तिक पौर्णिमा उत्सव १८ नोव्हेंबर रोजी पौर्णिमा प्रारंभ होत असून दुपारी दुपारी १२ वाजेपासून पासून सुरू होऊन २० नोव्हेंबर रोजी समाप्त होत आहे. कार्तिक पौर्णिमा १८ नोव्हेंबरला १२ वाजेपासून सुरू होवून १९ नोव्हेंबरला पहाटे २.२६ वाजता समाप्ती होते तर पहाटे २.३३ वाजता कृतिका नक्षत्र सुरू होवून १९ नोव्हेंबरला दुपारी २ वाजून ३६ मिनिटांनी समाप्ती होते. कृतिका नक्षत्र काळात दर्शन घेतल्यास अत्यंत महत्त्वाचे समजले आहे. तसेच कार्तिक नक्षत्र २० नोव्हेंबर सकाळी समाप्त होत आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही एमआयडीसी परिसरातील श्री काशी विश्वनाथ मंदिरात कार्तिकी पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. शुक्रवार व शनिवार हे दोन दिवस मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. तसेच भाविकांनी मास्क घालूनच मंदिरात प्रवेश करावा व सोशल डिस्टन्सिग पाळावे, असे आवाहन विमल हिरालाल राठी यांनी केले आहे. शहरातील गुजराल पेट्रोल पपांजवळील ओमशांतीनगर मधील शिवशंकर मंदिराच्या आवारात कार्तिक स्वामी मंदिर आहे.

हे मंदिर पुरातन असून कार्तिक पौर्णिमा कृ नक्षत्राचा एकत्रित योग आल्यावर मंदिर दर्शनासाठी गुरुवारी रात्री १२ वाजेनंतर (पहाटे १.२९ पासून ते शुक्रवारी १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजून २६ मिनिटांपर्यंत महिला व पुरुष भाविकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे. यावेळी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे.

 

 

भाग १
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/5016619718404356

 

भाग २

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1027507491439095

 

Protected Content