पाचोरा येथील विद्यार्थ्यांचे तायक्वांदो ग्रीन बेल्ट परीक्षेत यश

पाचोरा प्रतिनीधी । पाचोरा तालुका तायक्वांदो असोसिएशन व जळगाव जिल्हा तायक्वांदो असोसिएशनतर्फे घेण्यात आलेल्या तायक्वांदो ग्रीन व ग्रीन वन बेल्ट परीक्षेत यश प्राप्त केले असुन प्रशिक्षक सुनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले होते.

शहरातील भडगाव रोडवरील शक्तिधाम येथे संपन्न झालेल्या परिक्षेत जळगाव जिल्हा तायक्वांदो असोशिएशनचे सचिव अजित घारगे व पाचोरा येथिल तायक्वांदो असोशिएशनचे प्रशिक्षक सुनिल मोरे हे परिक्षक म्हणुन उपस्थित होते. यांनी घेतलेल्या परिक्षेत ग्रीन वन बेल्ट गटात तिलक परदेशी, महेंद्र सोनवणे,भैरवी महाजन, करिश्मा पाटील, प्रवीण खरे, ऋतिक खरे तर ग्रीन बेल्ट गटात प्रज्ञा सोनवणे, ऋषिका देवरे, क्षितिज महाजन, नियती गंभीर, जीवनी बागुल, साहिल बागुल, चैताली पाटील, दिव्या सोनवणे, श्रावणी पाटील, प्रनवी पाटील, दिव्याराज पाटील, जयदीप परदेशी, गुरूषरण सोमवंशी, सुमित्रा सोमवंशी व  रुपल गुजर या सर्व विद्यार्थ्यांना यश प्राप्त केले.

या यशाबद्दल प्रतिक्रिया देतांना क्रीडा प्रशिक्षक सुनिल मोरे म्हणाले की, मला सहकार्य करणारे रमेश मोर यांच्या संकल्पनेनुसार आजच्या विज्ञान युगात विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांमध्ये सहभाग घेउन जागतिक पातळीवर यश मिळवावे ही भावना नेहमी प्रोत्साहन देणारी असुन विद्यार्थ्यांचे परिश्रम आणी पालकांचा विश्वास यामुळेच हे शक्य झाले. गुणवंत  यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Protected Content