ज्येष्ठांचे आशिर्वाद नेहमीच श्रेष्ठ असतात — छाया दाभाडे

 

एरंडोल, प्रतिनिधी । जीवनात ज्येष्ठांचे आशिर्वाद नेहमीच महत्त्वाचे असतात व त्यामुळेच आपली प्रगती होते असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष छाया दाभाडे यांनी केले. त्या एरंडोल येथील सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघातर्फे सुर्योदय दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले त्यावेळी बोलत होत्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त तहसिलदार तथा सुर्योदय ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष अरूण माळी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सभासद तथा ज्येष्ठ पत्रकार प्रा. शिवाजीराव अहिरराव, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे उपस्थित होते. कार्यक़्रमाची सुरूवात साने गुरूजींच्या खरा तो एकची धर्म ही प्रार्थना म्हणून करण्यात आली. प्रास्ताविक संघाचे ज्येष्ठ सभासद कवी निंबा बडगुजर यांनी केले. प्रा. शिवाजीराव अहिरराव यांनी संस्थेच्या कार्याचे कौतूक करून शुभेच्छा दिल्यात. सुर्योदय दिनदर्शिका दरवर्षी प्रकाशित करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अध्यक्षपदावरून अरूण माळी यांनी सभासदांनी आपले आरोग्य सांभाळून कोरोनासारख्या महामारीला प्रभावीपणे सामोरे जावून प्रतिकारशक्ती वाढवा तसेच संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सांगितले. यापुढे आता दरवर्षी सुर्योदय दिनदर्शिका काढण्यात येवून ३० डिसेंबर हा दिवस कॅलेंडर दिवस म्हणून संस्थेमार्फत साजरा करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
सूत्रसंचालन विनायक कुळकर्णी यांनी तर आभार सचिव भिका गुरूजी यांनी मानले. कार्यक़्रमप्रसंगी डिसेंबर महिन्यात वाढदिवस असणार्‍या सभासदांचा संस्थेतर्फेस सत्कार करण्यात आला. कार्यक़्रमासाठी जाधवराव जगताप, पी. जी. चौधरी सर, वसंतराव पाटील, नामदेवराव पाटील, विश्वनाथ पाटील, गणेश आप्पा, भगवान महाजन, सुपडू शिंपी, जगन महाजन, भास्कर बडगुजर यांचेसह डॉ. अमृत के. पाटील, दर्शे आदी उपस्थित होते.

Protected Content