यंदाही पाल आश्रमात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे कार्यक्रम रद्द

 

रावेर: प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्शवभूमीवर गर्दी टाळण्यासाठी यंदाही पालच्या वृंदावन धाम आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत

 

सातपुडयाच्या पायथ्याशी वसलेल्या रावेर तालुक्यातील पाल या आदिवासी परिसरात भक्ति , प्रेम तथा ज्ञानाची अविरत गंगा प्रगट करणारे ब्रम्हलीन सद्गुरु संतश्री लक्ष्मण चैतन्य बापूच्या श्री वृंदावन धाम आश्रमात समाधि दर्शनाकरिता गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त देशभरातून दरवर्षी अंदाजे पन्नास हजाराच्यावर चैतन्य साधक परिवाराची मांदियाळी भरत होती.परंतु मागील वर्षापासून कोरोना महामारीच्या संसर्गामुळे यंदाही 23 जुलैचे गुरुपौर्णिमा महोत्सव कार्यक्रम शासनाच्या आदेशाचे पालन करीत रद्द करण्यात येत आहेत.असे अखिल भारतीय चैतन्य साधक परिवार रावेर तालुका समितिसह आश्रमाचे विद्यमान गादीपति संत श्री गोपाल चैतन्य महाराज यांचेतर्फे आवाहन करण्यात आले आहे

 

यंदा ची गुरुपौर्णिमासुद्धा मागील वर्षाप्रमाणे साधकानी आपापल्या घरिच साजरी करावी पाल आश्रमातून सोशल मीडिया च्या माध्यमातून सद्गुरु बापूजी समाधी दर्शन लाईव प्रसारण दाखविन्यात येणार असून कोणतेही भाविकानी गुरुपौर्णिमा च्या दिवशी पाल आश्रमात न येता फेसबुक , यूट्यूब च्या सहायाने घरिच ऑनलाइन दर्शनाचा लाभ घ्यावा असे ही सांगण्यात आले.

Protected Content