Home धर्म-समाज सभागृहास कै.प्रभाकर महाजन यांचे नामफलक लावा : नगसेवक वानखेडे यांची मागणी

सभागृहास कै.प्रभाकर महाजन यांचे नामफलक लावा : नगसेवक वानखेडे यांची मागणी

0
39

सावदा, प्रतिनिधी | शहरातील गट नं.६४९-६५० मधील नवीन बांधलेल्या सभागृहास कै.प्रभाकर बुला महाजन यांचे नामफलक न लावल्यास बुधवारी होणाऱ्या सभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा नगरसेवक राजेश गजानन वानखेडे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, सावदा नगरपरिषदेने न.पा.मालकिच्या गट नं.६४९-६५० 0 मध्ये नवीन सभागृह बांधण्यात आले आहे. या सभागृहास कै.प्रभाकर बुला महाजन यांचे नांव देण्याचा ठराव नगरपरिषदेने पारीत केलेला आहे. परंतु, आजपावेतो सदरील सभागृहास नामफलक लावलेला नाही. .दि. १५ डिसेंबर रोजी सदर सभागृहाचे उद्घाटन झालेले असून त्यावेळी नगरपरिषद ठरावाचा विसर नगरपरिषदेस पडला असून सभागृहाचा नामकरण फलक लावणेत आलेला नाही. तरी सदर सभागृहास नामकरण फलक न लावल्यास बुधवार दि. २२ डिसेंबर रोजी होणा-या सभेवर बहिष्कार टाकणार आहे.तरी तत्पुर्वी नामकरण फलक लावण्यात यावा अशी मागणी केली आहे.


Protected Content

Play sound