निर्मल इंटरनॅशनल स्कूलमधील कलाशिक्षकांची सह्याद्री वाहिनीवर मुलाखत

पाचोरा, प्रतिनिधी । निर्मल इंटरनॅशनल स्कूल पाचोरा येथील कला शिक्षक शैलेश कुलकर्णी यांची काही दिवसांपूर्वी सह्याद्री वाहिनीवरील “बियॉंड द थॉट” या कार्यक्रमासाठी रांगोळीकार म्हणून निवड झाली होती. त्यानिमिताने झालेल्या मुलाखतीत त्यांच्या कलाकृती आणि त्यांचा प्रवास सांगितला आहे.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण शनिवार, दिनांक २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता तसेच रात्री १० वा. व पुनः प्रक्षेपण २१ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी १.३० वा. होणार आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित असलेले शैलेश कुलकर्णी हे मुंबई येथील जे. जे. कला महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असून खान्देशातील प्रसिद्ध रांगोळीकार म्हणून परिचित आहे.

रांगोळीच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळपर्यंत पोहोचल्याबद्दल संस्थेच्या अध्यक्षा वैशाली सुर्यवंशी, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, शालेय शिक्षण संचालक डॉ. भगवान सावंत, प्राचार्य गणेश राजपूत, उपप्राचार्य प्रदिप सोनवणे आणि प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Protected Content