यावल शहरात विसर्जन मिरवणूक शांततेत !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरातील २१ तर यावल पोलीस ठाण्याच्या परीसरातील ग्रामीण भागातील १५ असे एकुण ३५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीस आज पारंपरिक वाद्य-वृंदाच्या गजरात रविवारी सायंकाळपासून सुरवात झाली आहे. विसर्जन मिरवणूकी पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गणेशोत्सावाच्या पाचव्या दिवशी यावल शहरात २० सार्वजनिक तर एक खाजगी असे २१ गणेश मंडळानी श्रीची पाच दिवशीय स्थापना केलेली होती. या सर्व गणेश मंडळाच्या विसर्जन मिरणुकीस रविवारी ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ढोल-तासे, यासह विविध वाद्य-वृंदाच्या गजरात मिरवणुकीस प्रारंभ झाला आहे. काही मंडळांनी मिरवणुकीत सहभागी न होता परस्पर विसर्जन केले.

अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे परीक्षाविधीन उपाधीक्षक दिनेश बैसाणे येथील पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी चोख बंदोबस्त अतिश्य चोख राखला आहे. यावल शहरातील श्रीची मिरवणूक रात्री उशिरापर्यंत शांततेत सुरू असून कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही. शांतता समिती सदस्य, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

यावल शहराला आले पोलीस छावणीचे स्वरूप
मिरवणुकीसाठी बंदोबस्तासाठी अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांचे मार्गदर्शनाखाली डीवायएसपी – २ , पोलिस निरिक्षक – २ , सहाय्यक पोलिस निरिक्षक – १ , पोलिस उपनिरिक्षक -१२, पोलिस कर्मचारी – १०० , होमगार्ड – ८० , दंगा नियंत्रण पथक – १ , स्ट्रेकिंग फोर्स​ – २ , राज्य राखीव पोलीस दल – १ असा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने शहरात जागोजागी पोलीस दिसत असल्याने शहराला छावणीचे स्वरूप आले आहे.

ग्रामीण भागातील 15 सार्वजनिक मंडळाची विसर्जन
शहराव्यतीरीक्त येथील पोलीस ठाण्याच्या हद्यितील नायगाव(१), कोरपावली (४) , डांभुर्णी(६), दहीगाव (३), सावखेडासीम (१) अशा १५ श्री मंडळाचे विसर्जण करण्यत आले आहे.

Protected Content