पाचोरा येथे ‘राष्ट्रीय लोक अदालत’ संपन्न – ४१३ प्रकरणांचा निपटारा

पाचोरा, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथे तालुका विधी सेवा समिती, पाचोरामार्फत राष्ट्रीय लोक अदालत’ पाचोरा न्यायालयात संपन्न झाली. या अदालतीत ४१३ दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणांचा निपटारा होवून रूपये १ कोटी ९३ लाख २७ हजार २३५ रुपयांची वसुली झाली.

महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तथा उच्च न्यायालय, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव यांचे आदेशाने पाचोरा येथे तालुका विधी सेवा समिती, पाचोरा मार्फत राष्ट्रीय लोक न्यायालय दि. १२ मार्च २०२२ रोजी पाचोरा न्यायालयात संपन्न झाले.

या राष्ट्रीय लोक न्यायालयात ४१३ दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणांचा निपटारा होवून रूपये १ कोटी ९३ लाख २७ हजार २३५ रुपयांची वसुली झाली. या कार्यक्रमात तालुका विधी सेवा समिती, पाचोराचे अध्यक्ष तथा न्यायीक अधिकारी दिवाणी न्यायाधीश एफ. के. सिद्दीकी, सह दिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे, वकील संघाचे अध्यक्ष अॅड.प्रविण पाटील, उपाध्यक्ष अॅड.चंदन राजपुत, सचिव अॅड.राजेंद्र पाटील, तसेच पंच सदस्य अॅड. संध्या सांळुखे, अॅड. कविता चव्हाण व जेष्ठ विधीज्ञ मंडळी उपस्थित होते.

यावेळी तालुका विधी सेवा समिती, पाचोराचे अध्यक्ष एफ. के. सिद्दीकी यांनी आवाहन केले की, यापुढे दि. ७ मे २०२२ रोजी होणा-या लोक न्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून सहभाग नोंदवावा व लोक न्यायालय यशस्वी करून लाभ घ्यावा. लोक न्यायालय यशस्वीतेसाठी पाचोरा वकील संघ अध्यक्ष व सभासद विधीज्ञ मंडळी तसेच पंचायत समिती, पाचोराचे अधिकारी वर्ग, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक वृंद, बॅक कर्मचारी, दूरसंचार कर्मचारी, पोलीस कर्मचारी दिपक पाटील, विकास सुर्यवंशी, तसेच तालुका विधी सेवा समितीचे, वरिष्ठ सहाय्यक अमित दायमा, कनिष्ठ सहायक दिपक तायडे, ईश्वर पाटील, स्वप्नील पाटील, रविंद्र पाटील, रविंद्र महाजन, नितीन पाटील व न्यायालयातील सर्व कर्मचारी वृंद आणि पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.

 

Protected Content