महापौरांच्या आवाहनाला प्रतिसाद, प्रशासनाकडून साबणांचा साठा सुपूर्द !

जळगाव (प्रतिनिधी) शहर मनपाच्या आरोग्य आणि स्वच्छता विभागातील अधिकारी, मुकादम, कर्मचाऱ्यांचा स्वच्छतेसाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले होते. महापौरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रशासनाने निर्जंतुकीकरणासाठी साबणांचा साठा रेडक्रॉस सोसायटीमार्फत मनपाकडे सुपूर्द केला.

 

कोरोनाविरुद्ध लढा देताना डॉक्टरांसह जीव धोक्यात घालून शहर स्वच्छ ठेवणाऱ्या मनपाच्या आरोग्य व साफसफाई विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक धोका असतो. मनपा कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन महापौर भारती सोनवणे यांनी केले होते. महापौरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत केमिस्ट असोसिएशन, संपर्क फाऊंडेशन, भारत विकास परिषद, रेडक्रॉस यासारख्या अनेक संस्था पुढे येत आहे. शनिवारी देखील जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, उपजिल्हाधिकारी प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली साबणांचा साठा महापौरांकडे सुपूर्द केला. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, अतुलसिंग हाडा, मनोज काळे, सहाय्यक आयुक्त पवन पाटील, रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष गनी मेमन, सचिव विनोद बियाणी, डॉ.प्रसन्नसुमार रेदासनी, सुभाष साखला, उज्ज्वला वर्मा, जळगाव शहर मंडळ अधिकारी योगेश नन्नवरे आदी उपस्थित होते.

 

साबणांचे असे होणार वितरण

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या साबणांच्या साठ्याचे वितरण केले जाणार आहे. त्यात कायम कामगार ४३२, मक्तेदाराचे कामगार ४००, वाहनचालक, हेल्पर २५०, कायम वाहनचालक ६३, व्हक्युम गार्ड ३३, आरोग्य निरीक्षक १९, मुकादम ४० अशा १२२७ कर्मचाऱ्यांना वितरित केले जाणार आहे.

Protected Content