औरंगाबादमध्ये सारी आजाराचे थैमान ; आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू

औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबाद शहरात सारी या आजाराने थैमान घातले असून या आजारामुळे आतापर्यंत जवळपास १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही शंभरपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 

या आजारामुळे फक्त औरंगाबादच नाही, तर संपूर्ण राज्यासमोर एक नवे संकट उभे ठाकले आहे. या आजाराचे रुग्ण औरंगाबाद, जळगाव, जालना, नाशिक सोलापूर आणि मुंबईतही आढळू लागले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. ‘सिव्हेअर अॅक्यूट रेस्परेटरी इन्फेक्शन’ असे सारीचे पूर्ण नाव आहे. सारी हा आजार फ्लू वर्गातील असून सर्दी, खोकला, त्यानंतर ताप आणि नंतर कमालीचा अशक्तपणा ही आजाराची लक्षणे आहेत. हा आजार कोरोना सदृश्य असला, तरी या आजारातील रुग्णांची ‘कोविड-19’ टेस्ट निगेटिव्ह येते. मात्र, याची लक्षणे तीव्र असल्यामुळे या आजारात रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. या आजाराच्या मृत्यूचे प्रमाण 13 टक्के आहे.

Protected Content