‘पॉझिटिव्ह’ बातमी : राज्यातील ३४ रूग्णांना मिळाला डिस्चार्ज

मुंबई वृत्तसंस्था । देशात कोरोनाने कहर केल्यानंतर राज्यातील सर्व यंत्रणा यशस्वी लढा देत आहे. राज्यात आत्तापर्यंत १९६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ३४ जणांना रूग्णालयात डिस्चार्ज देण्यात आल्याने ही सर्वांसाठी पॉझिटिव्ह बातमी आहे. यातील मुंबईतील १४ तर पुण्यातील १५ जणांचा समावेश आहे.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच, ‘पॉझिटिव्ह’ बातमी आली आहे. करोनाशी यशस्वी लढा देऊन राज्यातील ३४ रुग्ण घरी परतले आहेत. या सर्वांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या १९६वर पोहोचली आहे. त्यात मुंबई व ठाणे परिसरात १०७, पुणे ३७, नागपूर १३, अहमदनगर ३, रत्नागिरी १, औरंगाबाद १, यवतमाळ ३, मिरज २५, सातारा २, सिंधुदुर्ग १, कोल्हापूर १, जळगाव १ आणि बुलडाण्यात १ असे एकूण १९६ रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. या रुग्णांपैकी मुंबईतील १४, पुण्यातील १५, नागपूर १, औरंगाबाद १, यवतमाळ ३ अशा एकूण ३४ रुग्णांना पूर्णपणे बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आलं आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Protected Content