Home मनोरंजन नागराज मंजुळे सादर करणार कोण होणार करोडपती !

नागराज मंजुळे सादर करणार कोण होणार करोडपती !

0
122

68231571

मुंबई (वृत्तसंस्था) ‘कौन बनेगा करोडपती’ या हिंदी रिअॅलिटी शो आता मराठीतही येत आहे. ‘कोण होणार करोडपती’ हा शो येत असून सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते नागराज मंजुळे सादर करणार आहे. सोनी मराठी चॅनेलवर हा शो सुरू होणार असून चॅनेलच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून त्याचा व्हिडिओ टीझर रिलीज करण्यात आला आहे. व्हिडिओत नागराज मंजुळे सूत्रसंचालकाच्या खुर्चीवर बसलेले असल्याचे दिसून येत आहे.

हिंदी ‘केबीसी’मध्ये महानायक अमिताभ बच्चन हे सूत्रसंचालकाच्या भूमिकेत होते. अमिताभ यांचा सहभागी स्पर्धकांशी संवाद, प्रत्येक नव्या प्रश्नाबरोबर वाढणारी उत्कंठा आणि विजेत्यांना मिळणारी लाखा-लाखांची बक्षिसं यामुळे कार्यक्रमाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. या पार्श्वभूमीवर मंजुळे यांचा नवा शो प्रेक्षकांच्या मनाची किती पकड घेतो, याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.दरम्यान, हा शो नेमका कधी सुरू होणार हे मात्र सोनी टीव्हीने स्पष्ट करण्यात आलेलं नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound