कंजरवाड्यातील तीन गावठी दारूभट्ट्या उध्वस्त; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । शहरातील तांबापुरा कंजरवाडा परीसरात बेकायदेशीर दारू तयार करणाऱ्या तीन महिलांवर एमआयडीसी पोलीसांनी कारवाई करत कंजरवाडा येथील तीन दारूभट्ट्या उध्वस्त केल्या आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, शहरातील तांबापुरा कंजरवाडा परीसरात तीन महिला बेकायदेशीर दारू तयार करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांच्यासह पथकाने आज दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास तीन ठिकाणी कारवाई केली. यावेळी पोलीसांनी बेकायदेशीर तयार केलेली दारू आणि कच्चे पक्के रसायन असे एकुण ३२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

१. संशयित आरोपी बेबीबाई भरत बाटुंगे (वय-७०) रा. तांबापूरा कंजरवाडा हीच्या ताब्यातून ४ हजार २०० रूपये किंमतीचे १०५ लिटर गावठी दारू व ६ हजार रूपये किंमतीचे कच्चे पक्के रसायन मिळून आला,

२. संशयित आरोपी निलम गोपाल बाटुंगे (वय-३२) रा. तांबापुरा कंजरवाडा या महिलेकडून ३ हजार १५० रूपये किंमतीचे १०५ लिटर गावठी दारू व १२ हजार रूपये किंमतीचे कच्चे व पक्के रसायन मिळून आला. तर

३. रेखा सुर्यभान कंजर (वय-४४) रा. तांबापुरा कंजरवाडा हिचाकडे ३ हजार १५० रूपये किंमतीचे १०५ लिटर तयार गावठी दारू आणि ६ हजार रूपये किंमतीचे ड्रममये २०० लिटर मिश्रीत गुळे व नवसागर मिश्रीत कच्चे रसायने मिळून आले.

पोउनि गणेश कोळी, स.फौ. अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, पो.ना. सचिन मुंढे, पोका असीम तडवी, पोका गोविंदा पाटील, पोका संदीप पाटील, मुकेश पाटील अशपाक शेख यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी पो.कॉ. लुकमान तडवी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

————————-

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content