तामसवाडी येथील अल्पवयीन मुलाची रेल्वेखाली आत्महत्या

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील तामसवाडी येथील सोळा वर्षीय मुलाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी रावेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, तामसवाडी येथे रेल्वे गेटमन सतीष रायमळे यांचा १६ वर्षीय मुलगा भावलाल उर्फ भावळ्या सतीष रायमळे याने आज दुपारी १ ते २ वाजेच्या दरम्यान वाघोड ते रावेर दरम्यान रेल्वे खंबा क्रमांक ४८०/३१ जवळ अज्ञात धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली.

दरम्यान, आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी रेल्वे विभागाच्या खबरीवरून रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content