पीटर मुखर्जीला ह्रदयविकाराचा झटका

peter mukerjea

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शीना बोरा हत्या प्रकरणातील सहआरोपी पीटर मुखर्जी याला हृदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. छातीत दुखू लागल्याच्या तक्रारीनंतर पीटरला १६ मार्च रोजी जे. जे. रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. ह्रदय शस्त्रक्रियेसाठी त्याला खासगी रूग्णालयात हलवण्यास सीबीआय न्यायालयाने परवानगी दिली आहे.

पीटर मुखर्जी हा शीना बोरा प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शीनाची आई इंद्राणी मुखर्जीचा तिसरा पती आहे. तो या हत्याप्रकरणातील सहआरोपी असून सध्या तो आर्थर रोड कारागृहात आहे. या दोघांवर सध्या खटला सुरू आहे. सोमवारी पीटर मुखर्जीची अँजिओग्राफी करण्यात आली असता त्याच्यावर अँजिओप्लास्टी किंवा बायपास करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले. मुखर्जी यांच्या वकिलांनी पीटर यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी मागितली. यासाठीचा खर्च पीटर मुखर्जी हे स्वत:च करतील, असे देखील कोर्टात स्पष्ट करण्यात आले. यानंतर कोर्टाने पीटर मुखर्जीला खासगी रुग्णालयात हलवण्याची परवानगी दिली.

Add Comment

Protected Content