Home क्राईम बसस्थानक आवारातून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

बसस्थानक आवारातून महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लांबविली

0
56


भडगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव बसस्थानक आवारातून महिलेच्या गळ्यातून ५० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगल पोत लांबविली. भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, बेबीबाई रमेश पाटील (वय-५२, रा.माळीनगर शिरपूर ता. धुळे) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. आपल्या नातेवाईकांकडे ते भडगाव तालुक्यात आल्या होत्या. २३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास बेबीबाई पाटील ह्या भडगाव बस स्थानकाच्या आवारात आलेल्या असताना अज्ञात चोरट्याने  त्यांच्या गळ्यातील २४ ग्रॅम वजनाचे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत चोरून नेली. दरम्यान चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीही माहिती मिळाली नाही, अखेर त्यांनी भडगाव पोलीस ठाण्यात घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तात्याबा नागरे आहे.


Protected Content

Play sound