चारचाकीने दुचाकीला मारला कट : दोघे तरूण जखमी

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिरसाळा देवस्थानावरून दर्शन करून घरी परतणार्‍या तरूणांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन्ही तरूण जखमी झाले आहेत.

या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आज शनिवार असल्याने अनेक भाविक दर्शनासाठी शिरसाळा येथील श्री मारूतीरायाच्या दर्शनासाठी आले होते. यात बर्‍हाणपूरच्या रास्तीपुरा भागातील रहिवासी येथील मनोज प्रमोद ठाकुर (वय -२०) आणि मोहित गणेश महाजन (वय-१९) यांचा देखील समावेश होता. त्यांनी पहाटेच देव दर्शन घेतले. यानंतर ते घरी परत निघाले.

दरम्यान, पहाटे चार वाजेच्या सुमारास सारोळा ते माळेगावच्या दरम्यान वळण रस्त्यावर एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात मनोज प्रमोद ठाकुर व मोहित गणेश महाजन जखमी झाले. यातील मनोज ठाकुर यांच्या पायाचे अक्षरश: दोन तुकडे झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच दोन्ही जखमींना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

यानंतर या अपघातातील दोन्ही जखमींना उपचारासाठी बर्‍हाणपूर येथील रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: