भुसावळात भंगाराच्या गोदामाला भीषण आग

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ असलेल्या भंगाराच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत मोठी हानी झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

शहरातील शिरपूर-कन्हाळा रोडवर घोडेपीर बाबा यांचा दर्गा आहे. याच परिसरात असलेल्या अब्दुल अजीज यांच्या भंगाराच्या गोदामाला रात्री अडीच वाजेच्या सुरवातीला भीषण आग लागला. काही क्षणातच आगीचे लोट उठू लागल्याने परिसरातील नागरिकांनी येथे धाव घेतली. बराच वेळ फोन करून देखील अग्नीशामक दलाचे पथक आले नाही. सुमारे एक तासानंतर आलेल्या पथकाने प्रयत्न करून ही आग विझवली.

दरम्यान, आज पहाटे चार वाजेपर्यंत आग आटोक्यात आली. या आगीचे नेमके कारण समजले नसले तरी शॉर्ट सर्कीटमुळे हे अग्नीतांडव झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यात भंगारच्या गोदामातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. या आगीत अंदाजे दोन लाखांपेक्षा जास्त रूपयांची हानी झाल्याचे वृत्त आहे.

Protected Content