बच्चन आणि मंजुळे यांना कॉपीराईट उल्लंघन प्रकरणी नोटीस

amitap majule

 

मुंबई वृत्तसंस्था । मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा पहिला ‘झुंड’ हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘झुंड’ सिनेमात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत असून फूटबॉल प्रशिक्षण विजय बरसे यांची भूमिका साकारत आहेत. मात्र, आता हा चित्रपट कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. चित्रपट निर्माते नंदी कुमार यांनी कॉपीराईटचे उल्लंघन केल्याप्रकरणी नागराज मंजुळे यांच्यासह अमिताभ बच्चन आणि टीमला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.

नागराज मंजुळेंचं दिग्दर्शन आणि अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘झुंड’वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हैदराबादमधील चित्रपट निर्माते नंदी कुमार यांनी चित्रपटाचे निर्माते कृष्णन कुमार, टी-सीरिजचे एमडी भूषण कुमार, दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि बच्चन यांना स्वामित्त्वहक्काचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. हा चित्रपट ज्यांच्या जीवनावर आधारित आहे त्या विजय बरसे यांना देखील नोटीस पाठवली आहे.

कुमार असा दावा करतात की २०१७ मध्ये त्यांनी अखिलेश पॉल याच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याचे हक्क विकत घेतले. २०१० साली ब्राझील येथे झालेल्या होमलेस फुटबॉल वर्ल्ड कपच्या भारतीय संघाचा अखिलेश कॅप्टन होता. झोपडपट्टीत राहणारा, ड्रग्जच्या आहारी गेलेल्या अखिलेशचे आयुष्य फुटबॉलमुळे कसे बदलते अशी चित्रपटाची कथा असणार आहे. दुसरीकडे नागराज मंजुळेच्या झुंडची कथा अखिलेशचे प्रशिक्षक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. परंतु, विजय बरसे यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवताना अखिलेशलची कथा चित्रपटाच्या कथानकात महत्त्वाची ठरते. त्यामुळे सहाजिकच झुंडमध्ये अखिलेशची कथाही दाखवली जाणार. याच कारणानं झुंडच्या टीमकडून कॉपीराइटच उल्लंघन झाल्याचं कुमार यांचं म्हणणं आहे.

चित्रपटाच्या टीमला नोटीस पाठवल्यानंतर केवळ टी-सिरीजकडून नोटीसला उत्तर मिळाले असंही नंदी चिन्नी कुमार यांनी एका मुलाखतीत सांगितलं. ‘कायदेशीर नोटीस पाठवल्यावर मला केवळ टी-सीरिजकडून’ उत्तर मिळालं परंतु, त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण अस्पष्ट आहे’ असं ते म्हणाले. इतकंच नव्हे, तर झुंडच्या निर्मात्यांनी त्यांना धमकावल्याचा आरोपही नंदी यांनी केला आहे.

Protected Content