आयटम’ वक्तव्यावर उत्तर द्या

भोपाळ : वृत्तसंस्था । भाजपच्या महिला उमेदवाराला ‘आयटम’ म्हटल्याने मध्य प्रदेशात राजकारण तापलं आहे. निवडणूक आयोगाने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांना नोटीस बजावली आहे. ‘आयटम’ वक्तव्यावर ४८ तासांत उत्तर द्यावं, अशी नोटीस निवडणूक आयोगाने बजावली आहे.

भाजप नेत्या आणि मंत्री मंत्री इमरती देवी यांच्यावर केलेल्या टीकेवरून वाद वाढतच चालला आहे. राहुल गांधी यांनीही कमलनाथ यांनी केलेली टीका दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी कमलनाथ यांच्यावर नाराजी व्यक्त केली. कमलनाथ यांना राहुल गांधी यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेबाबत विचारलं गेलं. ‘ते राहुल गांधींचं वैयक्तीक मत आहे. मी कोणत्या संदर्भात विधान केलं हे मी आधीच स्पष्ट केलं आहे’, असं कमलनाथ म्हणाले.

इमरती देवी यांची माफी मागणार का? असा प्रश्नही कमलनाथ यांना केला गेला. मी माफी का मागावी. कुणाचा अपमान करण्याचा आपला हेतू नव्हता. पण कुणाला अपमान झाल्याचं वाटत असेल तर याबद्दल खेद व्यक्त करतो, असं कमलनाथ म्हणाले होते. कमलनाथ यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केलीय.

कमलनाथ यांनी भाजप नेत्या आणि मंत्री इमरती देवी यांच्यावर टीका करताना कमलनाथ यांची जीभ घसरली आणि त्यांनी इमरती देवी यांचा ‘आयटम’ असा उल्लेख केला. यावरून वाद वाढतच गेला.

राष्ट्रीय महिला आयोगाने मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. मध्य प्रदेश सरकारच्या मंत्री इमरती देवी यांच्याविरोधात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी ‘आयटम’ अशी टीका केल्याच्या वक्तव्या संदर्भात आवश्यक कारवाई करण्याची मागणी केली होती.

Protected Content