पाचोरा येथे मुस्लिम बांधवांतर्फे रूग्णांना फळ वाटप

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा येथे मुस्लीम समाजाचे सुफी संत धर्म गुरु सय्यद अब्दुल कादीर जीलानी रहमतुल्ला अली यांची पुण्यतिथी साजरा करण्यात आली. यावेळी रूग्णांना फळ वाटप करण्यात आले.

 

इस्लाम धर्मातील “अवलीया इकराम” चे शेख अब्दुल कादीर जिलानी रह हे सरदार असून त्यांची मोठी ख्याती आहे. त्यांची पुण्यातिथी इस्लामी महिन्यानुसार‌ ११ रबि उस्सानी’ रोजी असते. म्हणून त्यांचे अनुयायी या दिवसाला ‘ग्यारवी शरोफ’ म्हणून साजरा करतात. त्यांना पुण्य लाभो (इसाले सवाब) या हेतूने मुस्लीम समाज या दिवशी नमाज पठण करतात, सदका (खैरात / दान) देतात. शेख अब्दुल कादीर जिलानी रहमतुल्ला अलै यांना गरीबांची मदत करणे, गरीबांना / भुकेलेंना जेवण देणे पंसत होते. ते नेहमी लंगर (सर्वांसाठी जेवण) ठेवत असे. त्यानुसार त्यांचे अनुयायी या दिवशी लंगर ठेवून लोकांना जेवू घालतात. अशा विविध प्रकारे त्यांची पुण्यातिथी साजरी केली जाते.

 

आज सुन्नी मदरसा पंजतन पाक व मस्जीद ए नज़ीर अहेलेसुन्नत पाचोरातर्फे वेगळ्या पध्दतीने ग्यारवी शरीफ साजरी करण्यात आली. आज १७ रोजी मदरसाचे पंच मंडळींकडून शहरातील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल जनरल वार्डात भेट देऊन रुग्णांची अयादत (विचारपुस) केली. त्यांना मदरसाचे इमाम अब्दुल कादीर यांचे हस्ते फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. इमरान पिंजारी, इब्राहीम खाटीक, शेख अनिस, शेख जावेद रहिम, अलताफ खाटीक, शफियोद्दीन ठेकेदार, इरफान खाटीक, नासीर खान, निसार पिंजारी हे उपस्थित होते.

Protected Content