अमळनेर नगरपालिकेने दिली पाण्याची नासाडी करणाऱ्यांना नोटीस

water wastage

अमळनेर (प्रतिनिधी) सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असुन काही प्रभागात पिण्याच्या पाण्याची नासाडी होत असल्याचे नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या निर्दशनास आणून दिले असता त्यांनी लागलीच त्याची दखल घेत ज्या भागात असे प्रकार होत आहेत, त्या भागातील नागरिकांना नोटीस बजावली असून सात दिवसांच्या आत खुलासा मागवला आहे. खुलासा सादर केला नाही तर संबंधितांचे नळ कनेक्शन बंद करण्यात येईल, असे यासंदर्भातील परिपत्रकात म्हटले आहे.

 

ओमशांतीनगर स्वामी समर्थ बोर्डजवळ-१, ओमशांती नगर-३, शिरुड नाका शिवसेना बोर्डाजवळ-१, अथर्व बंगलोज-३, बांधकाम करणारे-२, सोहम नगर-४, मुंदडा नगर डिपीजवळ-१, मुंदडा नगर टाकीजवळ-२, हे बांधकाम धारक पिण्याच्या पाण्याची नासाडी करत असल्याने त्यांचे नळ कनेक्शन बंद करावेत, असे पत्रकात म्हटले आहे. या नोटीसीत म्हटले आहे की, दि.१७ मे रोजी रोटेशननुसार आपल्या प्रभागात पाणीपुरवठा होत असतांना आपण पिण्याच्या पाण्याचा दुरुपयोग करत असल्याचे पाणी पुरवठा पाहणी पथकास समक्ष आढळून आलेले आहे. तरी सध्या भीषण पाणी टंचाईची परिस्थीती असुनही आपण पिण्याचे पाणी अंगणात सडा टाकणे, गटारीत पाणी सोडणे, अश्याप्रकारे पाण्याची नासाडी करत असल्याने आपले नळ कनेक्शन कायमस्वरुपी बंद का करण्यात येवू नये, याचा लेखी खुलासा सात दिवसांच्या आत नगरपरिषदेस द्यावा.

Add Comment

Protected Content