यावल बालसंस्कार विद्यामंदीर शाळेतर्फे किल्ले प्रदर्शन स्पर्धा

यावल, प्रतिनिधी | येथील बाल संस्कार विद्या मंदीर या शाळेत राजमाता जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्रच्या लेकींचा या अभियानांतर्गत किल्ले प्रदर्शन स्पर्धा घेण्यात आली. या किल्ले प्रदर्शनाने विद्यार्थी प्रभावित झालेत.

 

किल्ले प्रदर्शन स्पर्धेत ६वी ते ७वीच्या विद्यार्थी व विद्यार्थीनी करीता आयोजित करण्यात आली होती . यावल येथील बालसंस्कार विद्यामंदीर या शाळेत राजमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सन्मान महाराष्ट्र लेकींचा या अभियांतर्गत शाळेतील इत्तया ६ वी ते ७च्या विद्यार्थी आणी विद्यार्थी करीता दिनांक ७ जानेवारी २०२२ रोजी किल्ले प्रदर्शन स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या होत्या. या स्पर्धत किल्ले प्रदर्शन वेळी विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक किल्लंल्यांची माहीती देण्यात आली. राज्यातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या किल्ल्यांची प्रतिकृती बघुन शाळेचे सर्व विद्यार्थी हे प्रभावित झालेत.. शाळेत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल माळी हे होते. या किल्ले प्रदर्शनाचे आयोजन करण्यासाठी शाळेचे जेष्ठ शिक्षीका साविता गाजरे, प्रशांत महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रामदास भिरूड व .तनुजा काकडे यांनी परीक्षकांची भुमिका बजावली. कार्यक्रमात यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी महत्वाचे परिश्रम घेतले.

Protected Content