धावत्या रेल्वेखाली अनोळखी प्रौढाची आत्महत्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भादली-जळगाव अप रेल्वे लाईनवर धावत्या रेल्वेखाली अनोळखी प्रौढ व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली. शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

शनीपेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भादली-जळगाव अप लाईनवरील रेल्वे खंबा क्रमांक ४२२-१० जवळ एका अंदाजे ४७ वर्षीयी अनोळखी पुरूषाने बुधवारी १ जून रेाजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कुशीनगर सुपरफास्ट एक्सप्रेस खाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मयताची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नाही. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव  घेतली. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला.  लोको पायटल  एम.पी. जोशी यांनी दिलेल्या खबरीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक मनोज येऊलकर करीत आहे.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!