अवैध गौण खनिजची वाहतूक करणारे डंपर पकडले

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । अवैध गौण खनिजाची वाहतूक करणारे डंपर महसूल अधिकाऱ्यांनी पकडले आहेत. यामुळे गौण खनिज वाहतूकदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी सुत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, रावेर कडून चिनावल गावाकडे जात असतांना  विना परवाना गौण खनिज (मुरुम) वाहतूक करत असतांना खिरोदा मंडळ अधिकारी जि. डी. भंगाळे, तलाठी पी. पी. नायदे यांच्या पथकाने एमएच १९ सिटी ६५७८ डंपर थांबवुन वाहतुकीचे परमिट तपासले असता त्यांच्याकडे परमिट नव्हते. यावेळी डंपर जप्त करण्यात आले.दरम्यान रावेर तहसीलदार यांची लवकरच रावेरातुन बदली होणार असल्याने अवैध गौण खनिजची वाहतूककडे दुर्लक्ष होत आहे.

 

Protected Content