माहेरहून पैसे आणावे यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घर व शेतातील विहिर बांधण्यासाठी माहेरहून पैसे आणावे; यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आल्याची घटना घडली असून याप्रकरणी म्हसावद येथील विवाहितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील माहेर असलेल्या मोहिनी विनोद बोरसे (वय-३६) यांचा विवाह धुळे जिल्ह्यातील आंबोळा येथील विनोद चिंतामण बोरसे यांच्याशी रितीरिवाजानुसार २००८ मध्ये झाला. लग्नाच्या सुरुवातीला २ वर्षे चांगले गेल्यानंतर पती विनोद बोरसे यांनी विवाहितेला शेतातील विहीर बांधण्यासाठी व घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, अशी मागणी केली. परंतु विवाहितेने पैशांची पूर्तता न केल्याने मनात राग ठेवून पती विनोद बोरसे याने वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. शिवाय सासू, जेठ, जेठाणी, दीर आणि नंणद यांनी देखील पैशांची मागणी करत छळ केला.

या छळाला कंटाळून विवाहिता मोहिनी बोरसे या माहेरी म्हसावद येथे निघून आल्या. शुक्रवार, दि. २२ जुलै रोजी दुपारी दीड वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती विनोद चिंतामण बोरसे, सासू लालाबाई चिंतामण बोरसे, जेठ प्रवीण चिंतामण बोरसे, जेठाणी शोभाबाई प्रवीण बोरसे, दीर अनिल चिंतामण बोरसे सर्व रा. आंबोळा ता.जि. धुळे आणि नणंद संगीता विलास सैंदाणे रा. डांगरी ता.अमळनेर यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक स्वप्नील पाटील करीत आहे.

Protected Content