Home क्राईम जळगावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

0
100

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तींने फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस करण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. २१ जुलै रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास मुलगी एकटी घरी असतांना अज्ञात व्यक्तीने केला काहीतरी आमीष दाखवून फूस लावून पळून नेले.

मुलगी परिसरातून बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला. परंतु मुलगी कुठेही आढळून न आल्याने अखेर शुक्रवार २२ जुलै रोजी मध्यरात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.


Protected Content

Play sound