‘छे..छे..झुकली रे झुकली, मराठी बाणा सांगणारी सेना झुकली’ – शेलार

ashish shelar

मुंबई वृत्तसंस्था । राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी वक्तव्य केल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. दरम्यान राज्यात विरोधी पक्षांनी शिवसेनेलाही धारेवर धरले आहे. आता भाजप नेते आशिष शेलारांनीही शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले आहेत. आशिष शेलारांनी ट्विट करत ‘छे..छे..झुकली रे झुकली, मराठी बाणा सांगणारी शिवसेना सत्तेसाठी काँग्रेससमार झुकली’ अशी ट्वीटव्दारे शिवसेनेवर विखारी टीका केली आहे.

“नाही धार “सच्चाई”कारांच्या शब्दांना आज दिसली “रोखठोक”लेखणी त्यांच्याकडेच पाहुन म्हणे हसली सत्ता पहा कशी आज सावरकरांच्या अपमानापेक्षा मोठी ठरली नागू सयाजी वाडीतून का नाही महाराष्ट्र धर्माची उजळणी झाली? छे..छे..झुकली रे झुकली मराठी बाणा सांगणारी सेना सत्तेसाठी काँग्रेस समोर झुकली!” असे ट्वीट आशिष शेलारांनी केले.

दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. महाराष्ट्रातून नव्हे तर देशभरात राहुल गांधी यांच्या ‘त्या’ वक्तव्याचा निषेध केला जात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी तिव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ‘उद्धव ठाकरेंनी जाहीररित्या राहुल गांधींना जोडे मारावेत’, असेही रणजित सावरकर यांनी म्हटले आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Protected Content