परीट धोबी समाजाच्या आरक्षणाला काही नेते व अधिकार्‍यांचा विरोध- फडणविसांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

30BMDEVENDRAFADNAVIS

मुंबई प्रतिनिधी । धोबी आणि परीट समाज्याला अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट न करण्यासाठी मंत्रालयातील काही शासकीय अधिकार्‍यांनी आणि काही माजी मंत्र्यांनी प्रयत्न केला होता. मात्र, तो प्रयत्न भाजप सरकारने हाणून पाडल्याचा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. यामुळे खळबळ उडाली आहे.

आझाद मैदान येथे राष्ट्रीय रजक महासंघाच्या वतीने श्री संत गाडगे महाराज जयंती समारोह तथा समाज बांधव संमेलन २०२० चं आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या समारोपा प्रसंगी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, धोबी-परीट समाजावर अन्याय झालेला आहे. अनुसूचित जातींमधून त्यांना वंचित ठेवण्यात आलं आहे. अनुसूचित जातींमध्ये समावेश व्हावा यासाठी गेल्या २० वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. बार्टीचा अहवाल तयार झाला, तो चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आला. धोबी परीट समाज्याला अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट केलं जाऊ नये यासाठी मंत्रालयातील काही उच्चस्तरीय अधिकारी आणि माजी मंत्र्यांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, त्यांचे प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या सरकारने हाणून पाडले आहेत. आम्ही भांडे समितीचा अहवाल लागू करण्याचे प्रयत्न केले. हा अहवाल आम्ही केंद्राला पाठवला असल्याची माहितीदेखील फडणवीस यांनी याप्रसंगी दिली.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या गौप्यस्फोटामुळे प्रचंड खळबळ उडाली असून परीट धोबी समाज यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच ते माजी मंत्री व अधिकारी कोण ? याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

Protected Content