घुसखोर समजून तीन भारतीयांना पकडले; पुण्यात मनसेविरुद्ध पोलीस तक्रार

raj thackeray

 

पुणे (वृत्तसंस्था) राज ठाकरे यांनी घुसखोरांबद्दल आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात धडक मोहीम राबवत आहेत. परंतू पुण्यात घुसखोर समजून पकडलेले तिघं नागरिक भारतीय निघाल्यानंतर यातील एकाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेविरोधात पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

 

रोशन नुरहसन शेख या व्यक्तीने मनसेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. मनसेचे कार्यकर्ते बांगलादेशी असल्याचा ठपका ठेवत अल्पसंख्याकांच्या घरात जबरदस्तीने घुसतात आणि त्यांचा छळ करत करतात, असे रोशन शेखर यांनी तक्रारीत म्हटले आहे. राज ठाकरे यांनी बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांबद्दल आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई पाठोपाठ मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात तिघांना पकडले होते. हे तिघे बांगलादेशी असल्याच्या संशयातून मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांच्या नेतृत्वातील कार्यकर्त्यांनी त्यांना सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांनी तिघांची तब्बल सहा तास चौकशी केल्यानंतर ते भारतीयच असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर यातील रोशन शेख याने मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Protected Content