मुंबई पोलिस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती

मुंबई (वृत्तसंस्था) संजय बर्वेंच्या सेवानिवृत्तीनंतर मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाकरे सरकारने परिपत्रक काढून ही घोषणा केली.

 

संजय बर्वेंच्या सेवानिवृत्तीनंतर मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली.  तत्पूर्वी आज सकाळी मुंबई पोलीस पथकाकडून संजय बर्वे यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. नायगाव मैदानात त्यांचा शानदार निरोप समारंभ पार पडला. मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी परमबीर सिंह यांचे नाव सध्या आघाडीवर होते आणि अपेक्षेप्रमाणे त्यांचीच वर्णी या पदावर लागली. दरम्यान, अतिरिक्त पोलीस महासंचालक रजनीश शेठ आणि पुण्याचे पोलिस आयुक्त के व्यंकदेशम यांचीही नावं चर्चेत होती.  परमबीर सिंह हे यापूर्वीही मुंबई पोलिस आयुक्तपदाच्या शर्यतीत होते. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंह यांना डावलून संजय बर्वे यांची मुंबईच्या आयुक्तपदी नेमणूक केली होती. परमबीर सिंह यापूर्वी ठाण्याचे पोलीस आयुक्तही होते. सध्या परमबीर सिंह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक होते. आता महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कारभार बिपीन के.सिंग यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Protected Content